सर्गेई सोइगू यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्याचा पुतीन यांचा निर्णय

सर्गेई सोइगू यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्याचा पुतीन यांचा निर्णय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंत्रिमंडळाच्या फेरबदलाचा एक भाग म्हणून सर्गेई शोईगु यांना संरक्षण मंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला असून आता ते देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून पद सांभाळणार.

 

अर्थशास्त्रात पारंगत असलेले माजी उपपंतप्रधान आंद्रेई बेलोसोव्ह हे देशाचे नवे संरक्षण मंत्री होण्याचे क्रेमलिनने रविवारी सांगितले.

 

व्लादिमीर पुतिन या वर्षी पाचव्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले असून आता त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. रशियन कायद्यानुसार पुतिन यांनी क्रेमलिनचा ताबा घेतल्यानंतर मंगळवारी संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रविवारी सांगितले की पुतिन यांनी संरक्षण खाते एका नागरिकाला देण्याचा निर्णय घेतला.या वर्षी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत पुतिन यांनी 87 टक्के मते मिळवून विजय मिळवला.

Edited by – Priya Dixit 

 

 

Go to Source