मिली ब्राउन प्रियकर जेकसोबत विवाहबद्ध

मिली ब्राउन प्रियकर जेकसोबत विवाहबद्ध

‘स्ट्रेंचर थिंग्स’ सीरिजमधील कलाकार
हॉलिवूडचे लोकप्रिय कपल मिली बॉबी ब्राउन आणि जेक बोंगियोवी यांनी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘स्ट्रेंचर थिंग्स’ स्टार मिली बॉबीने मागील वर्षी दीर्घकालीन प्रियकर जेकसोबत एंगेजमेंट केली होती. तेव्हापासून चाहते तिच्या विवाहाची प्रतीक्षा करत होते. मिली आणि जेकने आता अत्यंत खासगी सोहळ्यात विवाह करत आयुष्यातील नव्या टप्प्याचा प्रवास सुरू केला आहे.
20 वर्षीय मिली आता 22 वर्षीय जेकसोबत विवाहबंधनात अडकली आहे. जेक हा मॉडेल आहे. या विवाहसोहळ्यात मिली आणि जेकचे आईवडिल उपस्थित होते. कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली आहे. दोघांनी अद्याप याची पुष्टी दिलेली नाही. तसेच या सोहळ्याची छायाचित्रे देखील समोर आलेली नाहीत.
मिली आणि जेक हे हॉलिवूडमधील सर्वात पसंतीच्या कपल्सपैकी एक आहेत. मिलीला ‘स्ट्रेंजर थिंग्स’मधील इलेवन या भूमिकेसाठी ओळखले जाते. ‘एनोला होम्स’, ‘गॉडजिला’, ‘मॉडर्न फॅमिली’ या सारख्या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये ती झळकली आहे. यापूर्वी तिला हॉलिवूड चित्रपट ‘डेमसेल’मध्ये पाहिले गेले हेत. ती सध्या ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या पाचव्या सीझनच्या तयारीत सामील आहे. या अखेरच्या सीझनचे चित्रिकरण सध्या सुरू असल्याचे समजते.