एमसीए अध्यक्ष काळे कालवश

एमसीए अध्यक्ष काळे कालवश

वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांचे रविवारी न्यूयॉर्क येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 47 वर्षीय अमोल काळे यांनी न्यूयॉर्कमध्ये रविवारी झालेल्या भारत-पाक दरम्यानच्या सामन्याला आपली उपस्थिती दर्शविली होती.
47 वर्षीय अमोल काळे यांनी 2022 च्या ऑक्टोबरमध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताचे माजी अष्टपैलू संदिप पाटील यांचा पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. विश्वचषक टी-20 स्पर्धेतील रविवारी भारत आणि पाक यांच्यातील चुरशीच्या सामन्याला अमोल काळे तसेच मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकरणी समितीचे सदस्य अजिंक्य नाईक आणि सुरज सामंत उपस्थित होते. मुंबई क्रिकेट संघटनेतर्फे अमोल काळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.