पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आमदार विनय कोरे

पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आमदार विनय कोरे

सरुडकर गटाचे समर्थक धनंजय पाटील यांचा खास. धैर्यशील माने यांना पाठिंबा

मलकापूर /प्रतिनिधी

पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य महायुती व मित्रपक्षाचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना देणार असल्याचा विश्वास आम. डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला . शित्तूर तर्फ मलकापूर येथील कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते . यावेळी सरुडकर गटाचे समर्थक धनंजय वसंत पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह खास . धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला .
यावेळी बोलताना उद्योगपती धनंजय पाटील यांनी सांगितले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती झाली आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शाहुवाडी तालुक्याचा देखील खारीचा वाटा असला पाहिजे. तसेच विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उद्योगपती धनंजय पाटील यांनी केले.
बैठकीस गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड , जि.प.माजी सभापती सर्जेराव पाटील (पेरीडकर), पं. स .चे माजी सभापती महादेव पाटील,विष्णू पाटील, बाबा लाड, शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबासो पाटील, नथुराम चव्हाण , विलास पाटील ,सरपंच तानाजी पाटील, सरपंच आबाजी पाटील ,गणपती पाटील, शामराव तळेकर (महाराज), दिपक पाटील, चंद्रकांत तळप,रोहिदास पाटील, तानाजी तळप, प्रकाश पाटील, सुभाष पाटील यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.