सुष्मिता सेनने सुंदर लहेंग्यात केला रॅम्पवॉक, ‘Taali’ पोझने वेधलं लक्ष

सुष्मिता सेनने सुंदर लहेंग्यात केला रॅम्पवॉक, ‘Taali’ पोझने वेधलं लक्ष

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉम्बे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने डिझायनर रोहित वर्माचे कलेक्‍शन रॅम्पवर सादर केले. गोल्‍डन कलरच्या लहंग्यात ती रॅम्पवॉकवर चालताना खूप सुंदर दिसत होती. तिने आपला लूक कलीरे आणि फुलांनी सजवून पूर्ण केलं होतं. (Sushmita Sen) सुष्मिता म्हणाली, ‘रोहित वर्मासाठी केलेला हा माझा दुसरा वॉक आहे, जो स्वत: ‘शी’ म्हणणे पसंत करतात. ते नेहमी दृढ असतात की, प्रत्येक क्षण उत्सव व्हावा.’ सुष्मिताने या गोष्टीवर जोर दिला की, आजच्या काळात ‘समावेशी’ होणं किती गरजेचं आहे. (Sushmita Sen)
अभिनेत्री सुष्मिताने सांगितलं की, ‘आजच्या काळात जगभरात समावेशी होणं किती आवश्यक आहे. म्हणून मी खूप भाग्यवान आहे की, त्यांनी केवळ मला तयार केलं नाही तर माझ्या आत्म्याला देखील तयार केलं आणि एकता, सद्भाव, चांगुलपणाचे उत्सव साजरा करण्याची संधी दिली.’ रोहित वर्माने शेअर केलं की, त्याचं संपूर्ण कलेक्‍शन प्रेमाच्या उत्सवाच्या आजूबाजूला फिरतो. तिचा हा रॅम्प वॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता म्हणाली, ‘मला लोक पसंत करतात आणि जेव्हा तुमच्याकडे माझ्यासारखे भाग्य असते, जिथे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. जेव्हा मी लाईव्ह (रनवे वर) येते, तेव्हा तो अनुभव खूप खास असतो. त्यावेळी तुम्हाला भीती किंवा अस्वस्थता होत नाही. मला खूप मजा येते.’