कर्नाटकसह 13 राज्यात पावसासह विजांचा इशारा

कर्नाटकसह 13 राज्यात पावसासह विजांचा इशारा

महाराष्ट्रात वादळासह गारपीट होण्याची शक्मयता, उत्तर प्रदेशसह 13 राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शनिवारी देशातील 13 राज्यांमध्ये पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा जारी केला आहे. कर्नाटकसह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, तामिळनाडू, दक्षिण पंजाब, हरियाणा, मेघालय, अऊणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि केरळ या राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट करण्यात आला आहे. तसेच 12 आणि 13 मे रोजी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशात वादळ आणि गारपीट होण्याची शक्मयता आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. उत्तराखंड आणि मध्यप्रदेशात 50-60 किमी प्रतितास वेगाने वादळ आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये तीव्र उष्णतेच्या वातावरणातच शुक्रवारी रात्री धुळीच्या वादळासह हलका पाऊस झाला. या कालावधीत झाडे पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. वादळामुळे अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या विविध अपघातात एकूण 23 जण जखमी झाले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 70 किमी दरम्यान नोंदवला गेला. खराब हवामानामुळे 9 उ•ाणे जयपूरकडे वळवण्यात आली. रस्त्यावर झाडे पडल्याने दिल्ली आणि परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. वादळ आणि पावसानंतर दिल्ली एनसीआरमध्ये वाढत्या उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळपासून वातावरण आल्हाददायक होते. हवामान खात्याने पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तराखंडमध्ये पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला असून बद्रीनाथ-ऋषिकेश महामार्गही बंद झाला आहे. राज्यातील डोंगराळ भागात आणि बद्रीनाथ महामार्गावर पीपळ कोठीजवळ झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले.
सात राज्यांमध्ये तापमान 40 अंशांवर
देशातील सात राज्यांमध्येही उष्णतेचा प्रभाव दिसून येत आहे. शुक्रवारी राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशा, महाराष्ट्र, हरियाणा आणि तेलंगणामधील काही ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे नोंद झाले. राजस्थानच्या काही भागात  उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमध्ये पुढील 5 दिवस उष्मा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.