स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धेत किज विजेती

स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धेत किज विजेती

वृत्तसंस्था/ स्ट्रासबर्ग
डब्ल्यूटीए टूरवरील येथे झालेल्या स्ट्रासबर्ग महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या मॅडिसन किजने एकेरीचे जेतेपद पटकाविताना आपल्याच देशाच्या डॅनिली कॉलिन्सचा पराभव केला.
अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित मॅडिसन किजने तृतीय मानांकित कॉलिन्सचा 6-1, 6-2 असा फडशा पाडला. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील मॅडिसन किजचे हे आठवे तर 2024 च्या टेनिस हंगामातील पहिले विजेतेपद आहे. खांदा दुखापतीमुळे किजने जवळपास 3 महिने पूर्ण विश्रांती घेतली होती. तिने माद्रिद स्पर्धेत उपांत्य फेरी तर रोम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. रेड क्ले कोर्टवर मॅडिसन किजची कामगिरी आतापर्यंत अधिक दर्जेदार झाली आहे. फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत मॅडिसन किजचा सलामीचा सामना मेक्सिकोच्या रिनेटा झेराझुआशी तर कॉलिन्सचा सलामीचा सामना अमेरिकेच्या डुलेडीशी होणार आहे.