कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात
वृत्तसंस्था/ लॉसेनी (स्विस)
2025 सालातील कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात भरवली जाणार आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. तब्बल 9 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली आहे.
भारतामध्ये पहिल्यांदाच कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश राहिल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तयाब इक्रम यांनी दिली. यापूर्वीची म्हणजे 2023 सालातील कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा कौलालंपूर येथे घेण्यात आली होती. आणि त्या स्पर्धेत जर्मनीने अजिंक्यपद पटकाविताना अंतिम सामन्यात फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला होता. या स्पर्धेत स्पेनने तिसरे तर भारताने चौथे स्थान मिळविले होते. 2013 (दिल्ली), 2016 (लखनौ), 2021 (भुवनेश्वर) साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची ही स्पर्धा भारताने भरविली होती. या स्पर्धेचे भारताला तीन वेळा यजमानपद मिळाले होते.
Home महत्वाची बातमी कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात
कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात
वृत्तसंस्था/ लॉसेनी (स्विस) 2025 सालातील कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात भरवली जाणार आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर करण्यात आला. तब्बल 9 वर्षांच्या कालावधीनंतर भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच कनिष्ठांची विश्वचषक हॉकी स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 24 संघांचा समावेश राहिल, अशी […]