चेन्नईन एफसीशी विलमार गिल करारबद्ध

चेन्नईन एफसीशी विलमार गिल करारबद्ध

वृत्तसंस्था/ चेन्नई
2024-25 च्या इंडियन सुपर लीग हंगामासाठी चेन्नईन एफसी संघाने कोलंबियाचा फुटबॉलपटू तसेच हुकमी स्ट्रायकर विलमार जॉर्डन गिल बरोबर नुकताच करार केला आहे.
कोलंबिया संघातील विलमार गिल हा अनुभवी फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 2022 साली विलमारने इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाकडून पदार्पण केले. यापूर्वी चेन्नईन एफसीने एलसीनो डायस आणि चिमा चुकऊ या विदेशी फुटबॉलपटूंसमवेत करार केला आहे. आता या संघामध्ये दाखल होणारा विलमार गिल हा तिसरा विदेशी फुटबॉलपटू आहे.