भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी गुरप्रीत सिंग संधू

भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी गुरप्रीत सिंग संधू

वृत्तसंस्था/ डोहा
2026 च्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरु असलेल्या पात्र फेरीच्या कतार विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत आणि कतार यांच्यातील हा सामना येत्या मंगळवारी डोहा येथे खेळविला जाईल.
भारतीय फुटबॉल संघाचे शनिवारी रात्री डोहा येथे आगमन झाले. येत्या मंगळवारच्या सामन्यात भारताने विजय मिळविला तर त्यांना तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविणे सुखकर ठरेल. अखिल भारतीय फुटबॉल फेरडरेशनने सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर बेंगळूर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.