गॉफ-सिनियाकोव्हा, अॅरव्हालो-पेव्हिक दुहेरीत अजिंक्य

गॉफ-सिनियाकोव्हा, अॅरव्हालो-पेव्हिक दुहेरीत अजिंक्य

 
वृत्तसंस्था/ पॅरिस
2024 च्या टेनिस हंगामातील येथे रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या प्रकारामध्ये अमेरिकेची कोको गॉफ आणि कॅटरिना सिनियाकोव्हा यांनी अजिंक्यपद पटकाविले. सिनियाकोव्हाचे ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील हे दुहेरीतील आठवे जेतेपद आहे. तर गॉफचे दुहेरीतील पहिले अजिंक्यपद आहे. त्याचप्रमाणे एल साल्वादोरचा मार्सेलो अॅरव्हेलो आणि क्रोएशियाचा पेव्हिक यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले.
महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात गॉफ आणि सिनियाकोव्हा यांनी इटलीच्या सारा इराणी आणि जस्मिन पावोलिनी यांचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात मार्सेलो अॅरव्हेलो आणि क्रोएशियाचा पेव्हिक यांनी सिमोनी बोलेली व अँड्रीया व्हेवासोरी यांचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 33 वर्षीय अॅरव्हेलोने 2022 साली या स्पर्धेत हॉलंडच्या रॉजेर समवेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते.