जांबावलीचा गुलालोत्सव आज

जांबावलीचा गुलालोत्सव आज

भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार
मडगाव : आज मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी जांबावलीचा प्रसिद्ध पारंपरिक गुलालोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. श्री दामबाबाच्या भाविकांसाठी जांबावलीचा गुलालोत्सव एक पर्वणीच असते. आज मंगळवारी शिशिरोत्सवाचा महत्त्वाचा दिवस असून दुपारी 3.30 वाजता ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय’च्या जयघोषात श्री दामबाबाच्या पालखीवर गुलालाची उधळण करून गुलालोत्सव साजरा केला जाणार आहे. जांबावलीच्या श्री दामबाबाच्या शिशिरोत्सवाला बुधवारपासून सुऊवात झाली होती. गेले सहा दिवस विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले. श्री दामबाबाच्या शिशिरोत्सवानिमित्त अनेक मठग्रामस्थांचा मुक्काम सध्या जांबावलीत आहे.  गुलालोत्सवात भाविकांनी केवळ ‘लाल’ रंगाचा गुलाल वापरावा, असे आवाहन मठग्रामस्थ हिंदुसभेच्या वतीने करण्यात आले आहे. आज दुपारपासूनच भाविक जांबावलीकडे ढोल-ताशांचा गजर करीत प्रयाण करणार आहेत. भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने केपे पोलिसांनी वाहतूक आणि शिस्त राखण्यासाठी सर्व उपाययोजना आखल्या आहेत. आज पहाटे श्री दामोदराची पालखी रामनाथ मंदिराच्या प्रांगणात आणून ठेवली जाईल आणि दुपारी गुलालोत्सवानंतर परत आपल्या मंदिरात नेली जाणार आहे. दामोदर देवावर गुलाल उधळल्याशिवाय भक्तांनी गुलालोत्सवाला सुऊवात कऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघणार आहे. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताची ‘संगीत सभा’ होईल. बुधवार दि. 2 रोजी सकाळी 10 वा. होणाऱ्या ‘धुळपेट’ने जांबावलीच्या शिशिरोत्सवाची सांगता होईल.