ज्योत्स्ना, अभय, वेलवान यांना सुवर्णपदके

ज्योत्स्ना, अभय, वेलवान यांना सुवर्णपदके

वृत्तसंस्था /चेन्नई
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय डबल्स चॅम्पियनशिप स्क्वॅश स्पर्धेत भारताचे स्क्वॅशपटू ज्योत्स्ना चिन्नाप्पा, अभय सिंग, वेलवान सेंचिलकुमार यांनी आपल्या विविध गटात शानदार कामगिरी गटात सुवर्णपदके मिळविली. अभय सिंगने पुरुष दुहेरीमध्ये वेलवान समवेत अंतिम लढतीत राहुल बैता व सुरजचंद यांचा 2-0 (11-4, 11-8) अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. अभय सिंग हा राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आहे. 25 वर्षीय अभय सिंगने या स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नाप्पा समवेत अंतिम लढतीत हरिंदर पाल सिंग संधू व रतिका सिलान यांचा 2-1 (10-11, 11-2, 11-9) अशा गेम्समध्ये पराभव केला. महिला दुहेरीत पूजा आरती आणि रतिका यांनी जेनत विधी आणि निरुपमा दुबे यांचा 2-1 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील पदक विजेते स्क्वॅशपटू आता 4-7 जुलै दरम्यान मलेशियात होणाऱ्या आशियाई स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतील.