क्रिकेट माझ्या रक्तातच दडलेय : उसेन बोल्ट

क्रिकेट माझ्या रक्तातच दडलेय : उसेन बोल्ट

नवी दिल्ली : उसेन बोल्टचे शक्य तितक्या वेगाने दौडणे हे नेहमीच लक्ष्य राहिलेले आहे आणि त्यामुळे त्याने टी-20 हा आपला आवडता क्रिकेट प्रकार म्हणून निवडणे यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. त्याचे वडील हे क्रिकेटप्रेमी असून त्यामुळे क्रिकेट आपल्या रक्तातच आहे, असे तो म्हणतो. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकांसह सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या बोल्टला जमैकामध्ये वाढताना वेगवान गोलंदाज बनायचे होते. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा दूत म्हणून त्याची निवड करण्यात अलेली असल्याने क्रिकेट जगताशी संबंधित स्वप्न जगण्याची त्याला संधी मिळणार आहे. ‘मी क्रिकेटवर वाढलो आहे. माझे बाबा क्रिकेटचे प्रचंड चाहते होते आणि अजूनही आहेत. माझ्या रक्तात नेहमीच ते राहिलेले आहे. खरे तर पुन्हा एकदा दूत या नात्याने क्रिकेटचा भाग बनणे खूप छान आहे.