भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं, दोघांचा मृत्यू महाडची घटना

भरधाव टेम्पोने चौघांना उडवलं, दोघांचा मृत्यू महाडची घटना

अलीकडील भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने नागरिकांना उडवण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. असा काहीसा प्रकार घडला आहे महाड येथे. महाड तालुक्यातील काळीजकोंड परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका टेम्पोने पादचारी चालणाऱ्या चौघांना उडवलं. या अपघातात दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

सदर घटना काळीजकोंड परिसरात सोमवार रात्रीची आहे. हे चौघे महाड एमआयडीसीतील  एका कंपनीत कामाला असून रात्रीपाळी साठी रस्त्यावरून पायी जात असताना एका वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला रविन्द्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मयतांची नावे आहे तर दोघे संतोष ढेबे आणि निलेश ढेबे हे जखमी झाले आहे.त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.    

 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source