इंग्लंड पराभूत, जर्मनी, पोलंड विजयी

इंग्लंड पराभूत, जर्मनी, पोलंड विजयी

वृत्तसंस्था/ लंडन
युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेपूर्वी येथे खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या सामन्यात आईसलँडने यजमान इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीने ग्रीसवर 2-1 अशी मात केली. पोलंडने युक्रेनचा 3-1 असा पराभव केला.
युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा जर्मनीत होणार आहे. या स्पर्धेपूर्वीचा खेळविण्यात आलेल्या शेवटच्या मित्रत्वाच्या सामन्यात आईसलँडने इंग्लंडवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. आईसलँडतर्फे जॉन स्टोनेसने 16 व्या मिनिटाला एकमेव निर्णायक गोल केला. दुसऱ्या सामन्यात जर्मनीने ग्रीसवर 2-1 असा विजय मिळविला. या सामन्यात 34 व्या मिनिटाला ग्रीसचे खाते जॉर्जियस मॅसोरेसने उघडले. 56 व्या मिनिटाला हॅवेजने जर्मनीला बरोबरी साधून दिली. 89 व्या मिनिटाला बदली खेळाडू पास्कल ग्रोसने जर्मनीचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवला. दुसऱ्या एका मित्रत्वाच्या सामन्यात पोलंडने युक्रेनचा 3-1 असा फडशा पाडला. या सामन्यात पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत युक्रेनने तीन गोल केले स्कॉटलंड आणि फिनलँड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला. युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडचा क गटातील सामना 16 जूनला सर्बियाबरोबर होणार आहे.