एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत

एलॉन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत

बर्नार्ड अरनॉल्टला टाकले मागे : मुकेश अंबानी यादीत 11 व्या स्थानी :फोर्ब्सची यादी जाहीर
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रेंच अब्जाधीश आणि लुईस विटो मोएट हेनेसी सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकून मस्क पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप एक्स व एआयमुळे मस्कची निव्वळ संपत्ती वाढली आहे, ज्याने 18 अब्ज डॉलर  ( 1.50 लाख कोटी रुपये) प्री-मनी व्हॅल्युएशनवर 6 अब्ज डॉलर (50 हजार कोटी रुपये) उभारले आहेत. एलॉन मस्क यांनी 9 मार्च 2023 रोजी ही एआय कंपनी तयार केली. बर्नार्ड अरनॉल्ट पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेले. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, एलॉन मस्कची एकूण संपत्ती 209.7 अब्ज (सुमारे 17.48 लाख कोटी) आहे, तर बर्नार्ड अरनॉल्टची एकूण संपत्ती आता 200.7 अब्ज (सुमारे 16.61 लाख कोटी) आहे. 4 महिने पहिल्या क्रमांकावर असलेले अरनॉल्ट आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्याचवेळी, जेफ बेझोस जवळपास 16.73 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीतील पहिल्या दहामध्ये भारतातील एकाही अब्जाधीशाचा समावेश नाही.
मुकेश अंबानी 11 व्या स्थानावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी 113.5 अब्ज डॉलर (सुमारे 9.46 लाख कोटी) संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत. या यादीत पाहिले गेल्यास गौतम अदानी 18व्या क्रमांकावर आहे.
समभागांची परिस्थिती
एलव्हीएमएच यांचा समभाग या दरम्यान एका महिन्यात 6 टक्के पेक्षा जास्त घसरला. मस्कची कंपनी टेस्लाच्या समभागामध्ये यावर्षी आतापर्यंत 28 टक्केपेक्षा जास्त घसरण झाली आहे. 1 जानेवारी रोजी ते 248.42 डॉलरवर होते, जे आता 177.03 (मे 29) पर्यंत खाली आले आहे. पण, बर्नार्डच्या कंपनी न्न्श्प् च्या समभागामध्ये अचानक घट झाल्याचा फायदा मस्कला झाला असल्याचे सांगितले जात आहे.