कांदोळी येथील कारवाईत 53.20 लाखाचे ड्रग्ज जप्त

कांदोळी येथील कारवाईत 53.20 लाखाचे ड्रग्ज जप्त

दोन राजस्थानी नागरिकांना अटक : राज्यात ड्रग्जचे व्यवहार वाढले
पणजी : केंद्रीय नार्कोटिक कंट्रो ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने कांदोळी येथे केलेल्या कारवाईत 53 लाख 20 हजार ऊपये किमंतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन राजस्थानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दोन्ही राजस्थानी संशयित ड्रग्ज प्रकरणात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून एनसीबीचे पोलीस त्याच्या  हलचालींवर नजर ठेवून होते. गुऊवारी दोन्ही संशयित कांदोळी येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री कारवाई केली. दोन्ही संशयितांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून 532 ग्रॅम मेथाम्फेटामाईन अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. गुऊवारी एएनसीने मधलावाडा, हरमल येथे केलेल्या कारवाईत 1 कोटी 69 लाख 47 हजार ऊपये किमंतीच ‘मॅजिक मशरुम’ नवीन अंमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्यानंतर एनसीबीने कारवाई करून सुमारे 53 लाखाचा ड्रग्ज जप्त केला आहे. राज्यात ड्रग्जचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.