तीन महिन्यांत चार कोटींचे ड्रग्ज जप्त
एएनसी, एनसीबीची कारवाई
पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अमलीपदार्थ तस्करीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी एनसीबी-गोवा विभाग, गोवा अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) कंबर कसली आहे. विशेषत: किनारी भागात गेल्या तीन महिन्यांपासून बेधडक कारवाई करून 4 कोटी 5 लाख 12 हजार ऊपये fिकमतीचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्या प्रकरणांमध्ये 9 संशयितांना अटकही करण्यात आली आहे. त्यात दोन स्थानिक तर पाच परप्रांतीय आणि दोन विदेशींचा समावेश आहे. एएनसीने पेलेल्या कारवाईमध्ये जानेवारी महिन्यात दोन तक्रारी नोंद केल्या असून यात दोघाजणांना अटक केली आहे. त्यात एक गोमंतकीय तर एक परप्रांतीय आहे. एकूण 65 लाख 40 हजार ऊपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यात 40 किलो 400 ग्रॅम गांजा आणि 5 किलो चरसचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन तक्रारी नोंद केल्या असून त्यात दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक गोमंतकीय तर एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे.
एकूण 93 लाख 5 हजार ऊपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यात 1 किलो 450 ग्रॅम चरस, 2 किलो 300 ग्रॅम गांजा, 480 ग्रॅम कोकेन तर 115 ग्रॅम एक्टासीचा समावेश आहे. मार्च महिन्यात दोन गुन्हे नोंद केले असून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यात दोन परप्रांतीय तर एका विदेशी नागरिकाचा समावेश आहे. एकूण 1 कोटी 94 लाख 47 हजार ऊपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत, त्यात एलएसडी, गांजा, सायलोसायबिन मशऊम आणि मॅजिक मशऊमचा समावेश आहे. याशिवाय गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि इतर पोलीस स्थानकात एकूण 20 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यात सीआयडी विभागाने 6, हणजूण पोलिसस्थानकाने 4, म्हापसा पोलिसस्थानक 1, कळंगुट पोलिसस्थानक 3, पेडणे पोलिसस्थानक 2, काणकोण 1, मुरगाव 1, कोंकण रेल्वे 1, वास्को 1 अशा तक्रारी नोंद केल्या आहेत. एकूण सर्व प्रकरणांमध्ये 24 संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 7 गोमंतकीय, 15 परप्रांतीय, तर 2 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. एनसीबीने एक कारवाई करून सुमारे 53 लाख 20 हजार ऊपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
Home महत्वाची बातमी तीन महिन्यांत चार कोटींचे ड्रग्ज जप्त
तीन महिन्यांत चार कोटींचे ड्रग्ज जप्त
एएनसी, एनसीबीची कारवाई पणजी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अमलीपदार्थ तस्करीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी एनसीबी-गोवा विभाग, गोवा अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) कंबर कसली आहे. विशेषत: किनारी भागात गेल्या तीन महिन्यांपासून बेधडक कारवाई करून 4 कोटी 5 लाख 12 हजार ऊपये fिकमतीचे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्या प्रकरणांमध्ये 9 संशयितांना अटकही करण्यात […]