अनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी
धर्मा प्रॉडक्शन्सच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन
चालू वर्षात अभिनेता सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर दिसून येणार आहे. याचबरोबर आता आणखी दोन दिग्गजांची भर या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये पडली आहे.
इब्राहिमच्या या चित्रपटात सुनील शेट्टी आणि दीया मिर्झा देखील दिसून येणार आहे. अनेक वर्षांनी सुनील शेट्टी आणि दीया मिर्झा एकत्र दिसून येतील. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु हा एक रोमँटिक कॉमेडी धाटणीचा चित्रपट असणार आहे.
शाउना गौतम यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटावरून करण जौहर अत्यंत उत्साही दिसून येत आहे. त्याने या चित्रपटाच्या मुहूर्त शॉटला सोशल मीडियावर शेअर केले होते. शाउनाने यापूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले होते. खुशी आणि इब्राहिमचा हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
Home महत्वाची बातमी अनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी
अनेक वर्षांनी एकत्र झळकणार दीया अन् सुनील शेट्टी
धर्मा प्रॉडक्शन्सच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन चालू वर्षात अभिनेता सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत खुशी कपूर दिसून येणार आहे. याचबरोबर आता आणखी दोन दिग्गजांची भर या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये पडली आहे. इब्राहिमच्या या चित्रपटात सुनील शेट्टी आणि दीया मिर्झा देखील दिसून येणार आहे. अनेक वर्षांनी सुनील शेट्टी आणि दीया मिर्झा एकत्र […]