CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी!

CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी!

सोशल मीडियावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरवात होणार आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी आली आहे. तसेच प्रयागराज पोलिसांनी धमकी देणाऱ्या या तरुणच शोध घेण्यास सुरवात केली असून त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. 

 

आरोपी शमीम उर्फ ​बबलू विरुद्ध प्रयागराजच्या गंगानगर नवाबगंज पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवली गेली आहे. तसेच सर्वेश कुमार हे सामाजिक कार्यकर्ते असून यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी धमकी देतांना असे म्हणाला की, जर माझ्या घरावर बुलडोझर चालवण्याची हिंमत केली तर योगी आदित्यनाथ यांना  खूप महागात पडेल. योगी आदित्यनाथ यांना व्हिडीओच्या माध्यमातून ही धमकी आरोपीने दिली आहे. 

 

हा आरोपी प्रयागराजमधील लाल गोपालगंज शहरातील रहिवासी असून याचे नाव शमीम उर्फ ​बबलू आहे. हा इमामगंज भागात राहतो. तसेच हा आरोपी सध्या दिल्लीमध्ये आहे व या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी प्रयागराज पोलिसांचे पथक दिल्लीकडे रवाना झाले असून या प्रकरणी एफआयआर केली आहे. 

 

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source