अमेरिकेत स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीयांचे वर्चस्व

अमेरिकेत स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीयांचे वर्चस्व

12 वर्षीय ब्रुहत सोमा ठरला विजेता :
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
फ्लोरिडा येथे इयत्ता 7 वीमध्ये शिकत असलेला 12 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी ब्रुहत सोमाने प्रतिष्ठित स्पर्धेत यश मिळविले आहे. ब्रुहतने टायब्रेकरमध्ये 29 शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगत ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ पुरस्कार स्वत:च्या नावावर केला आहे. या स्पर्धेचा विजेता म्हणून ब्रुहतला 50 हजार डॉलर्स इतकी रक्कम आणि अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यंदाची स्पर्धा टायब्रेकरपर्यंत पोहोचली, ज्यात ब्रुहतने 90 सेकंदांमध्ये 29 शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगत फैजान जकी याला पराभूत केले आहे.
फैजान हा लाइटनिंग राउंडमध्ये 20 शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगण्यास यशस्वी ठरला. टायब्रेकरमध्ये ब्रुहत पहिल्या स्थानावर राहिला. ब्रुहत सोमची शब्दांवर अद्भूत पकड आहे, 2024 स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बीचा चॅम्पियन! अविश्वसनीय स्मरणशक्ती असणारा मुलगा एकही शब्द विसरला नाही’ असे उद्गार आयोजकांनी काढले आहेत. ब्रुहतने 30 पैकी 29 शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगितले तसेच त्याने 2022 मध्ये हरिनी लोगनकडून नोंदविण्यात आलेला स्थायी स्पेल-ऑफ रिकॉर्डला मोडीत काढले आहे. स्पर्धेच्या पहिल्या स्पेल-ऑफदरम्यान लोगनने 26 पैकी 22 शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगितले हेते.