जेसिका पेगुला, मारिया सॅकेरीची आगेकूच

जेसिका पेगुला, मारिया सॅकेरीची आगेकूच

वृत्तसंस्था/ चार्ल्सटन
अमेरिकेच्या अग्रमानांकित जेसिका पेगुलाने एक सेटची पिछाडी भरून काढत आपल्याच देशाच्या अमांदा अॅनिसिमोव्हाचा पराभव करून चार्ल्सटन ओपन क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
पेगुलाने सात बिनतोड सर्व्हिस करीत अॅनिसिमोव्हावर 3-6, 6-4, 7-6 (7-3) अशी मात केली. पेगुलाने 15 पैकी केवळ 4 ब्रेकपॉईंटचा फायदा उठवला तर अॅनिसिमोव्हाने 8 पैकी 4 ब्रेकपॉईंट्सचा लाभ घेतला. तिसऱ्या मानांकित ग्रीसच्या मारिया सॅकेरीनेही तिसरी फेरी गाठली असून तिने बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया टोमोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव केला तर पोलंडच्या मॅग्डा लिनेटने पहिला सेट एकतर्फी गमविला. पण नंतरचे दोन सेट जिंकून तिने बल्गेरियाच्या 13 व्या मानांकित डायाना यास्त्रेम्स्कावर 0-6, 6-4, 6-3 अशी मात केली.
याशिवाय मियामी ओपन चॅम्पियन डॅनियली कॉलिन्स व स्लोअन स्टीफेन्स यांनी विजय मिळवित दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. कॉलिन्सने पॉला बेडोसाचा 6-1, 6-4 असा तर स्टीफेन्सने मॅग्डालेना फ्रेचचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडविला. स्टीफेन्स ही 2017 यूएस ओपन चॅम्पियन आहे. कॉलिन्सने हा आपला शेवटचा मोसम असल्याचे याआधीच जाहीर केले आहे. तिला मूत्राशयावर परिणाम करणारा विकार झालेला असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. अन्य विजयी खेळाडूंत टेलर टाऊनसेन्ड, अॅस्ट्रा शर्मा, कॅरोलिन डोलेहाइड, अशलीन क्रूगर, एलिजाबेटा कॉक्सिआरेटो यांचा समावेश आहे.