माळी गल्लीतील उघड्या ड्रेनेजमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

माळी गल्लीतील उघड्या ड्रेनेजमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

बेळगाव : ड्रेनेज चेंबरचे झाकण फुटल्याने माळी गल्ली दर्गारोड येथे वाहतूक तसेच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. चेंबरचे झाकण नसल्यामुळे या मार्गावर छोटे मोठे अपघातही घडत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी ड्रेनेज चेंबरवरील झाकण फुटले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या मार्गावरून ये-जा करणेही कठीण जात आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनत आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ड्रेनेज चेंबरवरील झाकण बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.