अजित पवार भाजपचे गुलाम : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारने अजित पवार यांना त्यांची जागा दाखवली. त्यांच्या वाट्याला भोपळा दिला आहे. प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती परत केली, आता मंत्रीपद मिळणार नाही, असे भाजपकडून त्यांना सांगण्यात आले. अजित पवार फक्त भाजपचे गुलाम आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. आज (दि.१०) खासदार संजय राऊत …

अजित पवार भाजपचे गुलाम : संजय राऊत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारने अजित पवार यांना त्यांची जागा दाखवली. त्यांच्या वाट्याला भोपळा दिला आहे. प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती परत केली, आता मंत्रीपद मिळणार नाही, असे भाजपकडून त्यांना सांगण्यात आले. अजित पवार फक्त भाजपचे गुलाम आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
आज (दि.१०) खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी सरकारचे मंत्रिमंडळ ओढून ताणून बनवले आहे. सरकारला दोन टेकू आहेत, त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घेवून विक्रम करायचा होता. आता नवीन मंत्रिमंडळ किती दिवस चालणार हे पाहावे लागेल, असे राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदी शपथ घेत असताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. अमित शहा गृहमंत्री असताना सांगत होते की जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आहे, पण काल समजलं तिथे किती शांतता आहे. जनतेचे पैसे लुटणे एवढच सरकारच काम आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
हेही वाचा :

सुनेला मंत्रिपदासाठी फोन येताच एकनाथ खडसे…
गडकरींसह महाराष्‍ट्रातील ‘या’ नेत्‍यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

 

Go to Source