वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बंदोबस्तात जातीने लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली होती. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मध्यरात्रीपर्यंत संवेदनशील भागात फेरफटका सुरू ठेवला होता. ड्रोन कॅमेऱ्याने मिरवणुकीवर नजर ठेवण्यात आली होती.
वळीव पावसामुळे मिरवणुकीला उशीर झाला. त्यामुळे बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातून आलेले अधिकारी व पोलिसांचीही काही प्रमाणात गैरसोय झाली. मिरवणुकीत मध्यरात्रीनंतर गर्दी वाढू लागली. त्यामुळे अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली होती. गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिरवणुकीचे चित्रिकरण करण्यात येत होते.
काकतीवेससह संवेदनशील भागात पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकारी स्वत: फेरफटका मारत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून नवे अधिकारी बेळगावला आले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन मिरवणूक बंदोबस्तासाठी यापूर्वी बेळगावात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.
काकतीवेस परिसरात विजापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांनी यापूर्वी शहापूरचे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यामुळे बेळगाव येथील शिवजयंती उत्सव मिरवणूक असो किंवा श्री गणेश विसर्जन मिरवणूक असो, त्याचा बंदोबस्ताचा अनुभव त्यांना आहे. अशा अनेक अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र व त्यांचे सहकारीही याच परिसरात तळ ठोकून होते.
संवेदनशील भागात व्हिडिओ चित्रिकरण करण्यासाठी खासगी व्हिडिओग्राफरना जुंपण्यात आले होते. एका खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात सहा व्हिडिओग्राफर कामाला लागले होते. साऊंड सिस्टीमची उंची डोकेदुखीची ठरत होती. मध्यरात्री मिरवणूक जाताना वीजतारा व केबलमुळे साऊंड सिस्टीम पुढे सरकणे कठीण जात होते. काही ठिकाणी स्वत: पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी प्रत्यक्ष उभे राहून खबरदारी घेत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ अधिकारी काकतीवेस परिसरात तळ ठोकून होते.
Home महत्वाची बातमी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बंदोबस्तात जातीने लक्ष
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बंदोबस्तात जातीने लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली होती. स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मध्यरात्रीपर्यंत संवेदनशील भागात फेरफटका सुरू ठेवला होता. ड्रोन कॅमेऱ्याने मिरवणुकीवर नजर ठेवण्यात आली होती. वळीव पावसामुळे मिरवणुकीला उशीर झाला. त्यामुळे बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातून आलेले अधिकारी व पोलिसांचीही काही प्रमाणात गैरसोय झाली. मिरवणुकीत मध्यरात्रीनंतर गर्दी […]