हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बुद्ध जयंती साजरी
बेळगाव : बुद्ध जयंतीनिमित्त हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी कैद्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक के. सी. दिव्यश्री, कारागृहाचे अधीक्षक विजय रोडकर, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, मल्लिकार्जुन कोण्णूर आदींच्या उपस्थितीत कारागृहातील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी बोलताना के. सी. दिव्यश्री म्हणाल्या, जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध एक महान पुरुष होते. राज्य व राजवैभवाचा त्याग करून ते जगाला आदर्श ठरले. आनंदाने जगायचे असेल तर आशेवर नियंत्रण असले पाहिजे. कैद्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी गौतम बुद्धांची शिकवण उपयुक्त ठरते. केवळ जयंती साजरी करून चालणार नाही. त्यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावेत. यावेळी कार्यालयीन अधीक्षक व्ही. एम. पाटील, लेखाधिकारी एस. सी. जालगेरी, जेलर बी. वाय. बजंत्री, राजेश धर्मट्टी, आर. बी. कांबळे, एफ. टी. दंडयनवर आदी उपस्थित होते. एस. एस. यादगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Home महत्वाची बातमी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बुद्ध जयंती साजरी
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बुद्ध जयंती साजरी
बेळगाव : बुद्ध जयंतीनिमित्त हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी कैद्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक के. सी. दिव्यश्री, कारागृहाचे अधीक्षक विजय रोडकर, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, मल्लिकार्जुन कोण्णूर आदींच्या उपस्थितीत कारागृहातील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी बोलताना के. सी. दिव्यश्री म्हणाल्या, […]