कोल्हापूर: अब्दुललाट येथे महापूजेने श्री कल्लेश्वर यात्रेस प्रारंभ

कोल्हापूर: अब्दुललाट येथे महापूजेने श्री कल्लेश्वर यात्रेस प्रारंभ

अब्दुल लाट: पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता. शिरोळ)  येथील यात्रेस जागृत देवस्थान श्री भगवान कल्लेश्वरच्या महापूजेने आज (दि. १२) दिपावली  दिवशी प्रारंभ झाला. तर दुपारी ४ वाजता पालखी सोहळा, लक्षवेधी असा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रम, श्रीं ची भव्य मिरवणूक व हेडाम, भाकणुकीचा कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दिवाळीपासून सुरू होणारी ही यात्रा पुढील ७ दिवस चालणार आहे. ही यात्रा मोठ्या यात्रेंपैकी एक यात्रा मानली जाते. प्रत्येक वर्षी ऐन दिवाळीत ही यात्रा येते. त्यामुळे या यात्रेस विशेष महत्व असते.
यात्रेनिमित्त खेळण्यांची, कपड्यांची, भांडीची दुकाने, पाळणे, खाऊचे स्टॉल्स, मनोरंजनाचे कार्यक्रम आले आहेत. पुढील सात ते दहा दिवसांत ग्रामदैवत श्री कल्लेश्वर मंदिरामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येतात.
श्री कल्लेश्वर देवस्थान व यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून यात्रा काळात बैल व घोडा गाडा शर्यती, कुस्ती, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डम्पिंग ट्रॅक्टर रिव्हर्स घेणे, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित स्पर्धकांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रा काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कुरुंदवाड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी ग्रामपंचायतीने व प्रशासनाने यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे.
हेही वाचा 

कोल्हापूरकरांच्या आशीर्वादानेच योजना पूर्ण : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : अज्ञातांनी खोडसाळपणाने फ्लँज काढल्याने थेट पाईपलाईनला गळती
कोल्हापूर : बोरवडे येथे दगडी मूर्तींची अघोरी पूजा; ग्रामस्थांत भीती

The post कोल्हापूर: अब्दुललाट येथे महापूजेने श्री कल्लेश्वर यात्रेस प्रारंभ appeared first on पुढारी.

अब्दुल लाट: पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता. शिरोळ)  येथील यात्रेस जागृत देवस्थान श्री भगवान कल्लेश्वरच्या महापूजेने आज (दि. १२) दिपावली  दिवशी प्रारंभ झाला. तर दुपारी ४ वाजता पालखी सोहळा, लक्षवेधी असा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रम, श्रीं ची भव्य मिरवणूक व हेडाम, भाकणुकीचा कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. दिवाळीपासून सुरू होणारी ही यात्रा पुढील ७ दिवस …

The post कोल्हापूर: अब्दुललाट येथे महापूजेने श्री कल्लेश्वर यात्रेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Go to Source