SenSex, Nifty दोन्ही वाधारले; गुंतवणुकदारांवर दिवाळीला धनवर्षा

SenSex, Nifty दोन्ही वाधारले; गुंतवणुकदारांवर दिवाळीला धनवर्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी दिवशी मुहूर्ताच्या सेशनमध्ये सेनसेक्स ३५४.७७ अंकांनी वधारत ६५, २५९.४५ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५० (Nifty 50) हा निर्देशांक ९८.१५ अंकांनी वधारत १९५२३.५० वर बंद झाला. शेअर बाजाराने रविवारी दमदार सुरुवात केल्याने विक्रम संवत २०८०ची सकारात्मक सुरुवात झाली आहे.
निफ्टी ५० (Nifty 50) हा निर्देशांक १९५७४.२५ला ओपन झाल तर बीएसई सेनसेक्स (BSE Sensex) ६५४१८.९८वर खुला झाला.
मुहूर्ताच्या ट्रेडमध्ये सुरुवातीला Coal India, UPL, Eicher Motors, NTPC आणि इन्फोसिस यांचे शेअर्स वधारले होते. त्यात कोल इंडियाच्या (Coal India) समभागाने ५२ आठवड्यातील सर्वोत्तम म्हणजे ३३५.८५ रुपये इतका भाव नोंदवला, ही वाढ ४ टक्के इतकी होती. तर जेपी पॉवर, येस बँक, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स पॉवर हे सर्वांत सक्रिय शेअर राहिले.
ऑटोक्षेत्रातील टीव्हीएस मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, आयशर मोटर्स, अशोक लेलँड या समभागांनी चांगली कामगिरी नोंदवली. तर नुकतेच आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारात आलेल्या ESAF स्मॉल फायनान्स बँक, ब्लु जेट हेल्थकेअर, व्हॅलिएंट लॅबॉरेट्रीज, जेएस डब्लू इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांच्या समभागात सरासरी २ टक्केंच्या वृद्धी झालेली होती.
बजाज फिनसर्व्हिस, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी, अपोल हॉस्पिटल यांनी मात्र निराशा केली.
तुम्हाला हे माहिती आहे का?
या वर्षी दिवाळीपर्यंत म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत भारतीय शेअर बाजार सकारात्मक राहिलेला आहे. S&P – BSE Sensex ने ५.९८ टक्के परतावा दिला आहे. तर BSE Mid Cap आणि BSE Small Cap ने अनुक्रमे २७ आणि ३० टक्के इतका परतावा दिलेला आहे. १५ सप्टेंबर २०२३मध्ये शेअर बाजारा ऐतिहासिक उंचीवर पोहोचला, पण त्यानंतर महागाई आणि भूसामरिक घडमोडी यामुळे बाजारावर दबाव दिसून आला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी मुहूर्ताला व्यवहार करताना संबंधित कंपनीची मूलभूत स्थिती कशी आहे, याचा नीट अभ्यास करावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.
यापूर्वीचे दिवाळी सत्र
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांयकाळी ६ ते ७.१५ या कालावधित मुहूर्ताचे सत्र असते. तसेच सुरुवातीची पंधार मिनिटं प्री-मार्केट सेशन असते. दिवाळी मुहूर्ताचे सत्र सहसा वधारलेले असते. २०२२मध्ये सेनसेक्स ५२४.५ अंकांनी वधारला होता, हे आतापर्यंतचे सर्वोत्तम दिवाळीचे सत्र राहिले आहे.
तर २०२१ला सेनसेक्स २९५.७० अंकांनी तर निफ्टी फिफ्टी ९१.८ अंकांनी वधारला होता. कोटक महिंद्रा बँक, एलअँडीटी, टीसीएस अशा कंपन्यांच्या समभागांनी चमकदार कामगिरी केली होती.
दिवाळीच्या मुहूर्त ट्रेंडिंगला प्रतिकात्मक मूल्य असते. पुढील वर्षी आपल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळावा, या भावनेने गुंतवणुकदार मुहूर्ताच्या ट्रेडमध्ये भाग घेतात. पण मुहूर्ताच्या ट्रेडमध्येही अभ्यास करून गुंतवणूक केली तर त्यातून भविष्यात चांगला परतावा मिळतो.
हेही वाचा

दिवाळी २०२३ : मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास आणि परंपरा | Diwali Muhurat Trading History
Diwali Muhurat Trading 2023 | दिवाळीत नफा कमवा! जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगची तारीख, वेळ
Diwali Muhurat Trading 2023 | काय आहे दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग?, जाणून घ्या वेळ, महत्त्व आणि इतिहास

The post SenSex, Nifty दोन्ही वाधारले; गुंतवणुकदारांवर दिवाळीला धनवर्षा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी दिवशी मुहूर्ताच्या सेशनमध्ये सेनसेक्स ३५४.७७ अंकांनी वधारत ६५, २५९.४५ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५० (Nifty 50) हा निर्देशांक ९८.१५ अंकांनी वधारत १९५२३.५० वर बंद झाला. शेअर बाजाराने रविवारी दमदार सुरुवात केल्याने विक्रम संवत २०८०ची सकारात्मक सुरुवात झाली आहे. निफ्टी ५० (Nifty 50) हा निर्देशांक १९५७४.२५ला ओपन झाल तर बीएसई …

The post SenSex, Nifty दोन्ही वाधारले; गुंतवणुकदारांवर दिवाळीला धनवर्षा appeared first on पुढारी.

Go to Source