जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी

जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी

जळगांव: चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावात अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून 2 लाख 35 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे वाल्मीक वसंत दिघोळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी घराच्या कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून घराच्या सेफ्टी गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख 65 हजार रुपये रोख तर 70 हजार सहाशे रुपये सोने चांदीचे दागिने असे दोन लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.
हेही वाचा :

‘शिवप्रताप’ पतसंस्थेचा दक्षिण भारतात विस्तार करू : शेखरराव साळुंखे
एकत्र येण्याची आमच्या कुटुंबाची पद्धत : शरद पवार
Amitabh Bachchan : ..तर तुम्ही फायनल मॅच पाहू नका, अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी दिला सल्ला

The post जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.

जळगांव: चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावात अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करून 2 लाख 35 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन पसार झाले. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे राहणारे वाल्मीक वसंत दिघोळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी घराच्या कंपाऊंडच्या गेटचे …

The post जळगाव : रोहिणी गावात दोन लाख 35 हजारांची घरफोडी appeared first on पुढारी.

Go to Source