‘टायगर ३’ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण

‘टायगर ३’ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ ( Tiger ३ ) हा चित्रपट रविवारी ( दि.१२ नोव्हेंबर) सिनेमा गृहात दाखल झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भरघोष अशी ४४.५० कोटींची करत धुमाकूळ घातला. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटींचा गल्ला जमवत अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. परंतु, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली. दरम्यान चित्रपटातील सलमानसोबत अभिनेता इमरान हाश्मीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या 

Amitabh Bachchan : ..तर तुम्ही फायनल मॅच पाहू नका, अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी दिला सल्ला
Madame Web : ‘मॅडम वेब’ चा धमाकेदार ट्रेलर; डकोटाच्या ॲक्शन सीनचा धुमाकूळ (video)
Nana Patekar Apology : तरुणाला मारल्यानंतर नाना पाटेकरांनी मागितली माफी

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानच्या ‘टायगर ३’ ( Tiger ३ ) चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटींची भरघोष अशी कमाई केली. यानंतर अवघ्या दोनच दिवसांत १०२ कोटींची कमाई झाल्याने तो १०० कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपटाचा समावेश झाला. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ४२.५० कोटी रूपयांचा कमाई केली. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या आकड्यात घसरण दिसली. चौथ्या दिवशी या चित्रपटाने केवळ २२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यत ‘टायगर ३’ या चित्रपटाने एकूण १६९.५० कोटी कमाई केली.
यामुळे चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’ च्या कमाईचा विक्रम मोडला आहे. येत्या आठवड्यात चित्रपट ३०० कोटींचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. सलमान, कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तर इमरानने खलनायकाची भूमिका साकारली.

 

View this post on Instagram

 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

The post ‘टायगर ३’ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ ( Tiger ३ ) हा चित्रपट रविवारी ( दि.१२ नोव्हेंबर) सिनेमा गृहात दाखल झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने भरघोष अशी ४४.५० कोटींची करत धुमाकूळ घातला. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटींचा गल्ला जमवत अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. परंतु, चौथ्या …

The post ‘टायगर ३’ च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण appeared first on पुढारी.

Go to Source