जळगाव : माजी सैनिकाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : माजी सैनिकाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

जळगाव : शहरातील पिंप्राळा भागत राहणारे माजी सैनिक असलेले जगदीश पाटील हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळा येथील मंगलमूर्ती प्लॉट नंबर 10 गट नंबर 187 /2 या ठिकाणी राहणारे जगदीश काशिनाथ पाटील हे माजी सैनिक असून 9 तारखेला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे एकुण एक लाख 35 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.   जगदीश पाटील घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात हा प्रकार आला त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.
हेही वाचा :

Vijay Wadettiwar : निवडणूक आयोग खिशात घालून फिरताहेत भाजप नेते : विजय वडेट्टीवार
SA vs AUS 2nd Semi-Final Match : सामन्यात पावसाचा व्यत्यय

The post जळगाव : माजी सैनिकाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

जळगाव : शहरातील पिंप्राळा भागत राहणारे माजी सैनिक असलेले जगदीश पाटील हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळा येथील मंगलमूर्ती प्लॉट नंबर 10 गट नंबर 187 /2 या ठिकाणी राहणारे जगदीश …

The post जळगाव : माजी सैनिकाच्या बंद घरावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.

Go to Source