गाझामधील अल-शिफा हॉस्पिटलशी संपर्क तुटला : WHO

गाझामधील अल-शिफा हॉस्पिटलशी संपर्क तुटला : WHO

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) आज (दि.१२) सांगितले. WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्‍ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली.
आपल्‍या पोस्‍टमध्‍ये गेब्रेयसस यांनी म्‍हटले आहे की, गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे. आरोग्य कर्मचारी, शेकडो जखमी रूग्ण, लाइफ सपोर्टवर असलेल्या बाळांसह आणि हॉस्पिटलमध्ये राहिलेल्या विस्थापित लोकांच्या सुरक्षेबद्दल आम्‍ही चिंतेत आहोत. गाझामधील जखमींचा जीव वाचवण्‍याचा आणि दुःखाची भीषण पातळी कमी करण्यासाठी तात्काळ युद्धविराम व्‍हावा, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे. सर्व ओलिसांना योग्य वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे आणि त्यांना बिनशर्त सोडले पाहिजे, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

Deeply worrisome and frightening: @WHO has lost contact with its focal points in Al-Shifa Hospital in #Gaza, amid horrifying reports of the hospital facing repeated attacks.
There are reports that some of those who fled the hospital have been shot at, wounded, or killed.
The… https://t.co/buhccOjRqF
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) November 12, 2023

दरम्यान, इस्रायली सैन्याने हमासवर हल्ले करणे सुरूच ठेवल्याने अल-शिफा हॉस्पिटलचे कर्मचारी आणि रुग्णांना, इतर गाझानांसह दक्षिणेकडे पळून जाण्याचे आवाहन केले आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, रुग्णालयातून पळून जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना लक्ष्य करून गोळीबार केल्याचे वृत्त आहे. गोळीबार करणारे हमासचे दहशतवादी होते, असा दावा इस्रायलने केला आहे. हमास दहशतवादी गटाने गाझा पट्टीमध्ये २३० नागरिकांना ओलीस ठेवले आहे.
हेही वाचा : 

इस्रायलच्या हल्ल्यात गाझात 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू
लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्‍या मोर्चाला हिंसक वळण, १२० अटकेत
‘भुकेने तडफडून मृत्‍यू झाला असता….’ गाझात अमेरिकन नर्सने अनुभवल्‍या मरणयातना

 
 
The post गाझामधील अल-शिफा हॉस्पिटलशी संपर्क तुटला : WHO appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) आज (दि.१२) सांगितले. WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्‍ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली. आपल्‍या पोस्‍टमध्‍ये गेब्रेयसस यांनी म्‍हटले आहे की, गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे. आरोग्य कर्मचारी, शेकडो जखमी रूग्ण, …

The post गाझामधील अल-शिफा हॉस्पिटलशी संपर्क तुटला : WHO appeared first on पुढारी.

Go to Source