लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्‍या मोर्चाला हिंसक वळण, १२० अटकेत

लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्‍या मोर्चाला हिंसक वळण, १२० अटकेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाला हिंसक वळण लागले. या प्रकरणी 120 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे तीन लाख पॅलेस्टाईन समर्थक माेर्चात सहभागी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही मोर्चा काढला. यावेळी झालेल्‍या संघर्षावर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चिंता व्यक्त केली आहे.
हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या स्मरणार्थ ब्रिटनमध्ये दरवर्षी युद्धविराम दिवस साजरा केला जातो. त्याच दिवशी पॅलेस्टाईन समर्थकांनी लंडनमध्ये मोर्चा काढून गाझामध्ये युद्धबंदीची मागणी केली. या मोर्चावेळी हिंसाचारझाला. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच हमासच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चावर टीकाही केली. या मोर्चावेळी हमासचे झेंडे फडकावले गेले. गाझामध्‍ये लढाई सुरु झाल्‍यापासून ब्रिटनमध्ये अनेक पॅलेस्टाईन समर्थक मार्चा काढत आहेत. शनिवार, दि. ११ नोव्‍हेंबर रोजी काढण्‍यात आलेला मोर्चा सर्वात मोठा होता.
पोलिस राहिले निष्काळजी
पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाला हिंसक वळण लागले, अशी शक्‍यता आधीपासूनच होती; परंतु लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी मोर्चावर बंदी घालण्यास नकार दिला. माेर्चावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडेल, अशी अपेक्षा नव्हती, असे पोलिसांनी म्‍हटलं आहे. या हिंसाचारानंतर लंडनमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेच्‍या गांभीर्याने तपास करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी पोलिसांना दिले आहेत. गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ माेर्चाला  द्वेषपूर्ण माेर्चा असे म्हटले आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्‍ला केला. १४०० लोकांची हत्या करत हमासच्‍या दहशतवाद्यांनी २०० हून अधिक लोकांचे अपहरण केले. इस्रायलने गाझा शहरावर हल्‍ला करत याला प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत इस्रायलने केलेल्‍या हवाई हल्ल्यात 11 हजारांहून अधिक लोक ठार झाले आहेत. गाझा पट्टीत युद्धबंदीची मागणी जगभर जोर धरू लागली आहे. मात्र, ओलिसांची सुटका होईपर्यंत युद्धविराम होणार नसल्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

Tens of thousands of pro-Palestinian protesters marched through central London, with far-right groups opposing the march in ‘significant numbers,’ British police said. More than 80 people were arrested to prevent a breach of the peace https://t.co/Ph4E3Zt7OE pic.twitter.com/QiKBAjgbAh
— Reuters (@Reuters) November 11, 2023

हेही वाचा :

फ्रान्‍स अध्‍यक्षांचे युद्धविरामाचे आवाहन इस्‍त्रायलला झोंबले, नेतान्‍याहू म्‍हणाले, “जागतिक नेत्यांनी…”
‘गाझा’साठी इस्‍त्रायलविरुद्ध मुस्‍लिम देशांची एकजूट, इराणचे राष्‍ट्रपती करणार सौदी अरेबिया दौरा
Israel-Hamas War : अमेरिकेने इस्‍त्रायलला फटकारले! गाझा शहर ताब्‍यात घेण्‍यावरुन दिला इशारा

The post लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्‍या मोर्चाला हिंसक वळण, १२० अटकेत appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाला हिंसक वळण लागले. या प्रकरणी 120 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे तीन लाख पॅलेस्टाईन समर्थक माेर्चात सहभागी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही मोर्चा काढला. यावेळी झालेल्‍या संघर्षावर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चिंता व्यक्त केली आहे. हमासच्या समर्थनार्थ घोषणाबाजी पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीच्या स्मरणार्थ ब्रिटनमध्ये दरवर्षी …

The post लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थकांच्‍या मोर्चाला हिंसक वळण, १२० अटकेत appeared first on पुढारी.

Go to Source