कोल्हापूर : फुलेवाडीतील खूनप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच जणांना अटक

कोल्हापूर : फुलेवाडीतील खूनप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच जणांना अटक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि.१३) रात्री गजबजलेल्या फुलेवाडीतील धाब्याजवळ पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा अमानुषपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयीतांसह पाच मारेकऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापुरात गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादातून जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे याच्याविरोधातही गर्दी, मारामारी आणि हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नलवडे हा फुलेवाडी येथील एका हॉटेलात मद्य प्राशन करून मित्रासमवेत दुचाकीवरून जात असताना समोरच्या दिशेने दोन हल्लेखोर दुचाकीवरून येत असल्याचे दिसून आले.
हल्लेखोरांनी केली होती शरीराची चाळण
दुचाकीवरून तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ऋषीकेश नलवडे याचा थरारकपणे पाठलाग करून त्याच्यावर तलवार, कोयता, एडक्याने हातावर, डोक्यावर पाठीवर, खांद्यावर एकापाठोपाठ एक असे सोळा खोलवर वार करून नलवडे याच्या शरीराची अक्षरशः चाळण केली होती.
पाठलाग करून वार
हल्लेखोरांना पाहताच नलवडे याने मित्राच्या दुचाकीवरून उडी टाकली. संभाव्य हल्ल्याची चाहूल लागताच त्याने मित्राला चौकातील पोरं बोलावून घे, असे सांगून फुलेवाडी येथील भर चौकातील धाब्यालगत असलेल्या रस्त्याने पलायन केले. पाठोपाठ हल्लेखोरांनीही नलवडे याचा पाठलाग सुरू केला. काही क्षणात शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार सुरू केले. वर्मी हल्ल्यामुळे नलवडे जीवाच्या आकांताने बचावासाठी ओरडू लागला. या आवाजाने परिसरातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाच्या डोळ्यांदेखत हल्लेखोर त्याच्या शरीराची चाळण करीत होते. हा जीवघेणा हल्ला पाहून बचावासाठी पुढे गेलेला जमाव तेथून पसार झाला
The post कोल्हापूर : फुलेवाडीतील खूनप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच जणांना अटक appeared first on पुढारी.

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी (दि.१३) रात्री गजबजलेल्या फुलेवाडीतील धाब्याजवळ पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय ३०, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा अमानुषपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयीतांसह पाच मारेकऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापुरात गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादातून जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे …

The post कोल्हापूर : फुलेवाडीतील खूनप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच जणांना अटक appeared first on पुढारी.

Go to Source