चालक देता का चालक? ‘बेस्ट’च्या मालाड विभागात जागोजागी जाहिराती

कांदिवली; पुढारी वार्ताहर : परिवहन विभागातील खासगीकरणाचा फटका तरुणांना बसत आहे. मालाड विभागात बेस्ट उपक्रमात बस चालकांची कमतरता आहे. त्यामुळे ‘बस चालक पाहिजेत’ अशा जाहिराती मालाड विभागात जागोजागी लावण्यात आल्या आहेत. बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागात खासगी बसचा समावेश करावा लागला. यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती … The post चालक देता का चालक? ‘बेस्ट’च्या मालाड विभागात जागोजागी जाहिराती appeared first on पुढारी.

चालक देता का चालक? ‘बेस्ट’च्या मालाड विभागात जागोजागी जाहिराती

कांदिवली; Bharat Live News Media वार्ताहर : परिवहन विभागातील खासगीकरणाचा फटका तरुणांना बसत आहे. मालाड विभागात बेस्ट उपक्रमात बस चालकांची कमतरता आहे. त्यामुळे ‘बस चालक पाहिजेत’ अशा जाहिराती मालाड विभागात जागोजागी लावण्यात आल्या आहेत.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून बेस्टला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी परिवहन विभागात खासगी बसचा समावेश करावा लागला. यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात बेस्टची परिस्थिती बिघडतच आहे. पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून मुंबईतील बस डेपोची काही जागा भाड्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपनी, ठेकेदार, खासगी वाहने उभी करण्यासाठी दिली आहे. बस चालकांना शासनाच्या नियमानुसार, पगार देणे अवघड होत असल्याने मुंबईतील बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येणार्‍या बस गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ‘बस चालक पाहिजेत’, असे पोस्टर मालाड विभागात जागोजागी लावण्यात आले आहेत.

खासगी बस चालवण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेले प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅज पाहिजे. एका वर्षाचा अवजड वाहन चालवण्याचा अनुभव आवश्यक आहे. राहण्याची सोय कंपनी करेल. चालकाला महिना 24 हजार पगार तर भविष्य निर्वाह निधीचा फायदा दिला जाणार आहे, असे जाहिरातीत नमूद केले असले तरी बसचालक तरुणांनी याकडे पाठ फिरवली आहे.
Latest Marathi News चालक देता का चालक? ‘बेस्ट’च्या मालाड विभागात जागोजागी जाहिराती Brought to You By : Bharat Live News Media.