शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल

शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल


पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमीने सात विकेट घेत मोठी कामगिरी बजावली. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे २५ ऑक्टोबर २०२१ चं आम्ही तुझ्यासोबत आहोत…असं ट्विट व्हायरल होवू लागलं आहे. जाणून घेवूया का होत आहे ट्विट. (Mohammed Shami)
Mohammed Shami : आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत…
२०२१ मध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या टी २० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव झाला. या सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बद्दल सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या गेल्या. त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी शमीच्या ऑनलाइन ट्रोलिंगवर ट्वीट करत मोहम्मद शमीला पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होत की,  “मोहम्मद शमी, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही. त्यांना माफ कर.”
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषकात बुधवारी (दि.१५) न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करत शमीचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “सामनावीर मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी! त्याच्या सातत्यपूर्ण सामना जिंकण्याच्या कामगिरीमुळे तो या विश्वचषकात एक उत्कृष्ट खेळाडू बनला आहे.
विश्वचषक सामन्यांमधील शमीच्या विकेटचे अर्धशतक पूर्ण
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर)  खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी टीम इंडिया 1983, 2003 आणि 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. या सामन्या दरम्यान टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी मिळवले. तर जसप्रित बुमराह आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट मिळाली.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने विश्वचषकाच्या आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (१५ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने जबरदस्त गोलंदाजी करत एकूण सात बळी घेतले. त्याने त्याच्या  संपूर्ण कार्यकाळात विश्वचषकात एकूण ५४ बळी घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे इतक्या विकेट घेणारा शमी हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच शमीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रमही मोडला.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
ग्लेन मॅकग्राथ (ऑस्ट्रेलिया) – ७१
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ६८
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – ५९
लसिथ मलिंगा (श्रीलंका) – ५६
वसीम अक्रम (पाकिस्तान) – ५५
मोहम्मद शमी (भारत) – ५४
ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – ५३

Mohammad #Shami we are all with you.
These people are filled with hate because nobody gives them any love. Forgive them.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 25, 2021

Superb bowling by man of the match, Mohammad Shami!
His consistent match winning performances have made him a standout player in this World Cup. pic.twitter.com/x14gZe2OZe
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 15, 2023

हेही वाचा 

Mohammed Shami : जीगरबाज मोहम्मद शमी! ‘सात’ विकेट घेऊन न्यूझीलंडचा उडवला धुव्वा
Mohammed Shami’s ex-wife : जगभर कौतुक मात्र, घटस्फोटीत पत्नी मोहम्मद शमीच्या विरोधात; म्हणाली, ‘शमीला माझ्या शुभेच्छा नाहीत’
Team India in WC Final : भारताची दिमाखात फायनलमध्ये धडक! उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

The post शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीत दमदार विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद शमीने सात विकेट घेत मोठी कामगिरी बजावली. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे २५ ऑक्टोबर २०२१ चं आम्ही तुझ्यासोबत आहोत…असं ट्विट व्हायरल होवू लागलं आहे. जाणून घेवूया का होत आहे ट्विट. (Mohammed …

The post शमीची दमदार कामगिरी आणि राहुल गांधींचे ‘ते’ जुने ट्विट व्हायरल appeared first on पुढारी.

Go to Source