‘भोगावती’ कारखाना पी. एन. पाटीलच वाचवू शकतात : अरूण डोंगळे

‘भोगावती’ कारखाना पी. एन. पाटीलच वाचवू शकतात : अरूण डोंगळे


राशिवडे: पुढारी वृतसेवा : भोगावती साखर कारखाना वाचविण्याची धमक पी. एन. पाटील यांच्यातच आहे, म्हणूनच आम्ही राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मोठ्या मताधिक्याने ही आघाडी विजयी होणार यामध्ये तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केले. ते घोटवडे (ता.राधानगरी) येथे राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारसभेवेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.के.डोंगळे तर आमदार पी.एन.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डोंगळे पुढे म्हणाले की, गेली पाच वर्ष आमचीच सता होती, या दरम्यान पी.एन. पाटील यांनी काटकसरीचा कारभार केला. शेतकऱ्यांची ऊसबिले, तोडणी, ओढणी बिले वेळेवर अदा केली. आर्थिक स्थिती नाजुक असतानाही भोगावतीला सावरून घेत कारभार केला. यावेळी कृष्णराव किरुळकर शेकापचे क्रांतीसिह पवार-पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, उदयसिंह पाटील कौलवकर, जनता दलाचे वसंतराव पाटील, एम.आर.पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
धीरज डोंगळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. तर संदीप डोंगळे यांनी आभार मानले.
गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे व त्यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे आणि त्यांचेच चुलतबंधु विद्यमान संचालक धीरज डोंगळे यांनी पदयात्रा काढून मोठे राजकीय शक्ति प्रदर्शन केले.
हेही वाचा 

‘भोगावती’त शाहू शेतकरी आघाडीलाच मताधिक्याने निवडून आणणार: संपतराव पवार-पाटील
ए. वाय. पाटलांनी भोगावती कारखान्यात नोकरभरतीचा बाजार मांडला; सदाशिराव चरापलेंचा आरोप
भोगावती निवडणूक : शेकाप, जनता दल सत्ताधारी आघाडीसोबत

The post ‘भोगावती’ कारखाना पी. एन. पाटीलच वाचवू शकतात : अरूण डोंगळे appeared first on पुढारी.

राशिवडे: पुढारी वृतसेवा : भोगावती साखर कारखाना वाचविण्याची धमक पी. एन. पाटील यांच्यातच आहे, म्हणूनच आम्ही राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मोठ्या मताधिक्याने ही आघाडी विजयी होणार यामध्ये तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी केले. ते घोटवडे (ता.राधानगरी) येथे राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारसभेवेळी बोलत होते. अध्यक्षस्थानी बी.के.डोंगळे तर …

The post ‘भोगावती’ कारखाना पी. एन. पाटीलच वाचवू शकतात : अरूण डोंगळे appeared first on पुढारी.

Go to Source