कोहलीच्या वनडे शतकांचे ‘विराट अर्धशतक’! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

कोहलीच्या वनडे शतकांचे ‘विराट अर्धशतक’! सचिन तेंडुलकरला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat kohli 50th Century : विराट कोहलीने मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आपले 50 वे वनडे शतक झळकावून इतिहास रचला. वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने हा भीम पराक्रम केला. यासह त्याने सचिन तेंडुलकरला (49 वनडे शतक) मागे टाकून नवा विक्रम आपल्या नावावर केला. शतक झळकावल्यानंतर मैदानात उभा राहून विराटने सचिन सचिन तेंडुलकरला अभिवादन केले.
दरम्यान, कोहलीने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वचषकातील मोठा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. याबाबतीत त्याने सचिन तेंडुलकर (673), मॅथ्यू हेडन (659) आणि रोहित शर्मा यांना एकादमात मागे टाकले. विराटने बुधवारी (15 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक 80 धावा करत हा विक्रम रचला.
काय आहे रेकॉर्ड?
मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळताना विराट कोहलीने आणखी एक विक्रम केला. विश्वचषक स्पर्धेत 600 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. तसेच, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. 2003 च्या विश्वचषकात भारत उपविजेता असताना सचिन तेंडुलकरने एकूण 673 तर भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 648 धावा केल्या होत्या. आता या यादीत विराट कोहलीही सामील झाला आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली : 674 धावा (10 सामने)* विश्वचषक 2023
सचिन तेंडुलकर : 673 धावा (11 सामने) विश्वचषक 2003
मॅथ्यू हेडन : 659 धावा (11 सामने) विश्वचषक 2007
रोहित शर्मा : 648 धावा (9 सामने) विश्वचषक 2019
डेव्हिड वॉर्नर : 647 धावा (10 सामने) विश्वचषक 2019
The post कोहलीच्या वनडे शतकांचे ‘विराट अर्धशतक’! सचिन तेंडुलकरला टाकले मागे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat kohli 50th Century : विराट कोहलीने मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आपले 50 वे वनडे शतक झळकावून इतिहास रचला. वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्याने हा भीम पराक्रम केला. यासह त्याने सचिन तेंडुलकरला (49 वनडे शतक) मागे टाकून नवा विक्रम आपल्या नावावर केला. शतक झळकावल्यानंतर मैदानात उभा राहून विराटने सचिन सचिन तेंडुलकरला …

The post कोहलीच्या वनडे शतकांचे ‘विराट अर्धशतक’! सचिन तेंडुलकरला टाकले मागे appeared first on पुढारी.

Go to Source