पुणेकर म्हणतात.. पुण्यात डबलडेकर बस नकोच

पुणेकर म्हणतात.. पुण्यात डबलडेकर बस नकोच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल प्रशासन आणि दोन्ही महापालिका प्रशासनाने एकत्रित येत पुणेकर प्रवाशांकरिता मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर डबलडेकर बस खरेदीचा घाट घातला आहे. मात्र, शहराची भौगोलिक स्थिती, आर्थिक समस्यांनी ग्रासलेली पीएमपीची स्थिती, प्रवाशांचा फुकटचा उडणारा पैसा आणि वेळ यामुळे पुणेकर प्रवासी व तज्ञांकडून डबलडेकर बसला विरोध करण्यात येत आहे. याबाबत पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
या मार्गांवर धावणार बस
1) भोसरी- निगडी
2) मनपा- बाणेर
3) कात्रज- हडपसर
4) कात्रज- हिंजवडी (प्रस्तावित)
डबलडेकरचे असे होणार वाटप

60- 40 नुसार वाटप करण्याचे नियोजन
पुणे हद्दीत 12 डबलडेकर बस धावणार
पिंपरी-चिंचवड हद्दीत 08 बस धावणार

प्रवासी म्हणतात : प्रशासनाने विचार बदलावा
शहरातील मध्यवस्तीची भौगोलिक रचना पाहिली तर या डबलडेकर बस पुण्यात धावताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे या बस ठराविकच लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडाव्या लागतील. त्यामुळे याचा पुणेकरांना जास्त फायदा होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आपला विचार बदलावा, असे मत पुणेकर प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.
बस पांढरा हत्ती ठरतील : तज्ज्ञ
पुणे शहराच्या भौगोलिक स्थितीचा आणि प्रवासी हिताचा प्रशासनाला विचार करावा लागणार आहे. अन्यथा या बस यापूर्वी पीएमपीने ताफ्यात आणलेल्या जुन्या लाल रंगाच्या वोल्व्हो बसप्रमाणे पांढरा हत्ती ठरतील.
अशी आहे पीएमपीची आर्थिक स्थिती
पीएमपीची आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया… अशी सध्या स्थिती आहे. पीएमपीला महिना उत्पन्न 50 कोटी आणि खर्च 101 कोटीपर्यंत येत आहे. आणि सातव्या वेतन आयोगामुळे आणखी 10 कोटींचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही मनपाने डबलडेकर बसचा खर्च करण्यापेक्षा संचलन तूटमध्ये वाढ करून द्यावी. त्यासोबतच पीएमपीला सिंगल 12 मीटर, 9 मीटर, 7 मीटर लांबीच्या स्वमालकीच्या बस खरेदी करून द्याव्यात.
संचालक मंडळाच्या बैठकीत ‘ग्रीन सिग्नल’
तत्कालीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत ’डबलडेकर’ बस खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ’डबलडेकर’ला अखेर पुण्यात धावण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. या वेळी दोन्ही मनपा आयुक्तांसह पीएमपीचे संचालक उपस्थित होते.
असे आहे बस खरेदीचे नियोजन
संचालक मंडळाने बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासन भाडेतत्त्वावर या ईलेक्ट्रिक डबलडेकर बस खरेदी करणार आहे. या वेळी 200 सीएनजी बस आणि 100 ईलेक्ट्रिक बसची खरेदी केली जाणार असून, या 100 ई-बसपैकी 20 डबलडेक्कर ई-बस असतील. त्यातील 80 बस 12 मीटर किंवा 9 मीटर ई-बस असतील, असे नियोजन बकोरिया यांच्या काळात करण्यात आले होते.
पीएमपीच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बस खूपच कमी झाल्या आहेत. तर ठेकेदारांच्या बसचे प्रमाण वाढले आहे. मागे अनेकदा ठेकेदारांनी पैसे न मिळाल्यामुळे संप पुकारला होता, तेव्हा रस्त्यावरील पीएमपीच्या बस दिसेनाशा झाल्या होत्या. प्रवाशांचे त्यावेळी प्रचंड हाल झाले. आता पुन्हा जर ठेकेदारांनी अशी वेळ आणली तर प्रशासनासह प्रवाशांची बिकट अवस्था होईल, त्यामुळे पीएमपीने डबलडेकरपेक्षा सिंगल 12 मीटर लांबीच्या स्वमालकीच्या बस वाढविण्यावर भर द्यावा.
संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच
डबलडेकर बस घेऊन पीएमपी विनाकारण खर्च करत आहे. आपल्या शहरात सर्वाधिक छोटे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर पीएमपीकडे आता आहे, त्याच गाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आणखी डबलडेकरची भर घालून आणखी कोंडी कशाला करता, त्यापेक्षा छोट्या बस घ्या.
अजय रणपिसे, प्रवासी

हेही वाचा

जळगाव : शेतीच्या वाटणीसाठी मुलाने केला बापाचा खून
हवेत गरम पाणी फेकताच होतो बर्फ!
निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा उद्या बंद

 
The post पुणेकर म्हणतात.. पुण्यात डबलडेकर बस नकोच appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएमएल प्रशासन आणि दोन्ही महापालिका प्रशासनाने एकत्रित येत पुणेकर प्रवाशांकरिता मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर डबलडेकर बस खरेदीचा घाट घातला आहे. मात्र, शहराची भौगोलिक स्थिती, आर्थिक समस्यांनी ग्रासलेली पीएमपीची स्थिती, प्रवाशांचा फुकटचा उडणारा पैसा आणि वेळ यामुळे पुणेकर प्रवासी व तज्ञांकडून डबलडेकर बसला विरोध करण्यात येत आहे. याबाबत पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन …

The post पुणेकर म्हणतात.. पुण्यात डबलडेकर बस नकोच appeared first on पुढारी.

Go to Source