शेतकऱ्यांना दिवाळी भेट; आज जमा होणार १५ वा हप्ता

शेतकऱ्यांना दिवाळी भेट; आज जमा होणार १५ वा हप्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात पीएम किसान योजनेची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते.
आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना १४ हप्ते मिळाले आहेत. आज १५ वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११:३० वाजता १५ वा हप्ता खुंटी, झारखंड येथून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे पाठवले जातील.
हेही वाचा : 

दिवाळीत सेन्सेक्सची रॉकेट भरारी, ६०० अंकांनी वधारला
बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न
‘पीएसआय’ला चिरडल्‍याप्रकरणी बिहारचे मंत्री म्‍हणाले, “अशा घटना नवीन नाहीत”
सहारा समूहाचे संस्थापक सुब्रताे रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन
प्रतीक्षा संपली! टाटा टेक्नोलॉजीजचा IPO ‘या’ तारखेला खुला

 
The post शेतकऱ्यांना दिवाळी भेट; आज जमा होणार १५ वा हप्ता appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी आज पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात पीएम किसान योजनेची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित …

The post शेतकऱ्यांना दिवाळी भेट; आज जमा होणार १५ वा हप्ता appeared first on पुढारी.

Go to Source