‘अॅनिमल’ मधील वडील- मुलाच्या सुंदर नात्याचं नवं गाणं भेटीला

‘अॅनिमल’ मधील वडील- मुलाच्या सुंदर नात्याचं नवं गाणं भेटीला


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता अनिल कपूर याचे ‘अॅनिमल’ हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात खास करून वडील आणि मुलाच्या सुंदर नात्याचं नवं पर्व दाखविण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाचा धमाकेदार टिझर रिलीज होताच चाहत्यांची उत्कंठा वाढली. दरम्यान खास करून दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील ( Animal Song ) एक नवं गाणे भेटीला आणलं आहे. या गाण्याचे बोल ‘पापा मेरी जान’ असे आहे. सोशल मीडियावर हे गाणे रिलीज होताच चाहत्यांनी भऱभरून कॉमेन्टस केल्या आहेत.
संबंधित बातम्या 

Abdul Razzaq : ऐश्वर्या रायशी लग्न…वादग्रस्त वक्तव्य केल्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर अब्दुल रज्जाक ट्रोल
Tiger 3 Box Office Collection : ‘टायगर ३’ दोन दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल
राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘अॅनिमल’ हा चित्रपटातील गाण्यातील ( Animal Song ) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनिल कपूर रणबीरच्या खांद्यावर चालताना दिसतोय. तसेच यात त्यांनी चित्रपटातील ‘पापा मेरी जान’ घेवून आल्याचे सांगितले आहे. युट्यूब चॅनेलवर ‘अॅनिमल’ चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत अनिल कपूर एका मोठ्या उद्योगपती बलवीर सिंगची भूमिका साकारात आहे. त्याच्या मुलाची भूमिका रणबीरने साकारली आहे. पहिल्यांदा रणबीर लहान असताना त्याला त्याचे वडील सतत कामात असल्याने भेटत नसल्याचे दाखवण्यात आलं आहे. यामुळे तो एका वेगळ्याच दुनियेत जातो. मात्र, काही वयानंतर त्याचा मुलगा परत येवून वडीलांच्या खांद्याला आधार देताना दाखविले आहे. यानंतर त्याचा शब्द खाली पडू देत नाही किंवा तो नाकारू शकत नाही. असेही पुढे गाण्यात दाखवले आहे. वडील हे त्याच्यासाठी सर्वस्व असल्याचे सांगतानाही दिसतोय.
‘पापा मेरी जान’ या गाण्याला गायक सोनू निगमने सुरेल आवाज दिला आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. अनिल कपूर आणि रणबीरसोबत चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना, संदीप हुड्डा भूषण के यांनी भूमिका साकारली आहे. तर अभिनेता बॉबी देओलने खलनायक यांची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by anilskapoor (@anilskapoor)

The post ‘अॅनिमल’ मधील वडील- मुलाच्या सुंदर नात्याचं नवं गाणं भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेता अनिल कपूर याचे ‘अॅनिमल’ हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात खास करून वडील आणि मुलाच्या सुंदर नात्याचं नवं पर्व दाखविण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी चित्रपटाचा धमाकेदार टिझर रिलीज होताच चाहत्यांची उत्कंठा वाढली. दरम्यान खास करून दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटातील ( Animal …

The post ‘अॅनिमल’ मधील वडील- मुलाच्या सुंदर नात्याचं नवं गाणं भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source