ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ

ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ


पुढारी ऑनलाईन : ॲमेझॉनमध्ये (Amazon) नोकरकपात सुरूच आहे. आता गेम्स डिव्हिजनमधील १८० जणांना नोकरी गमावावी लागणार आहे. Amazon ने त्यांच्या गेम्स गेम्स डिव्हिजनमध्ये सुमारे १८० कर्मचारी कपात लागू केली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. व्यापक पुनर्रचना उपक्रमाचा भाग म्हणून ऑनलाइन रिटेल आणि डिजिटल स्ट्रीमिंगमध्ये दिग्गज असलेल्या ॲमेझॉनची एका आठवड्याच्या आत नोकरकपातीची ही दुसऱ्या फेरी आहे. (Amazon layoffs)
ॲमेझॉन गेम्सचे उपाध्यक्ष क्रिस्तोफ हार्टमन यांनी १३ नोव्हेंबरच्या ई- मेलमध्ये नमूद केले आहे की एप्रिलमधील पुनर्रचनेनंतर हे स्पष्ट झाले की व्यवसायाच्या प्रगतीसाठी भरीव वृद्धीची क्षमता दर्शविणाऱ्या क्षेत्रांसाठी संसाधनांचे अधिक केंद्रित वाटप आवश्यक आहे. “एप्रिलमध्ये आमच्या सुरुवातीच्या पुनर्रचनेनंतर, हे स्पष्ट झाले की आम्हाला आमची संसाधने अशा क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जी आमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी उच्च क्षमतेसह वाढत आहेत,” असे ते म्हणाले.
ज्या कर्मचार्‍यांना काढून टाकले जात आहे त्यांना सोमवारी सकाळी सूचित केले गेले आहे. जी या वर्षातील गेम्स डिव्हिजनमधील दुसरी कर्मचारी कपात आहे. याव्यतिरिक्त गेल्या आठवड्यात ॲमेझॉनच्या स्ट्रीमिंग म्युझिक आणि पॉडकास्ट विभागातही नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. तसेच पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नॉलॉजी (PXT) म्हणून ओळखल्या जाणार्‍या मानव संसाधन युनिटमध्ये काही प्रमाणात नोकरकपात करण्यात आली आहे.
एप्रिलमध्ये ॲमेझॉनने गेम्स युनिटमधील सुमारे १०० नोकऱ्या कमी केल्या होत्या. असे असूनही कंपनीने तिसऱ्या तिमाहीत निव्वळ उत्पन्नाची नोंद केली, जी विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षभरात Amazon ने २७ हजारांहून अधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही कपात टेक लेऑफच्या व्यापक ट्रेंडचा एक भाग आहे. (Amazon layoffs)

Amazon cuts jobs in games unit, part of broader restructuring https://t.co/KLfddCZgtd pic.twitter.com/DQMu2uCPB1
— Reuters (@Reuters) November 13, 2023

The post ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : ॲमेझॉनमध्ये (Amazon) नोकरकपात सुरूच आहे. आता गेम्स डिव्हिजनमधील १८० जणांना नोकरी गमावावी लागणार आहे. Amazon ने त्यांच्या गेम्स गेम्स डिव्हिजनमध्ये सुमारे १८० कर्मचारी कपात लागू केली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. व्यापक पुनर्रचना उपक्रमाचा भाग म्हणून ऑनलाइन रिटेल आणि डिजिटल स्ट्रीमिंगमध्ये दिग्गज असलेल्या ॲमेझॉनची एका आठवड्याच्या आत नोकरकपातीची ही दुसऱ्या फेरी …

The post ॲमेझॉनमध्ये नोकरकपात सुरूच, गेम्स डिव्हिजनमधील ‘इतक्या’ जणांना नारळ appeared first on पुढारी.

Go to Source