महाड : ४ कामगारांना टेम्‍पोने उडविले; दोघांचा मृत्‍यू

महाड : ४ कामगारांना टेम्‍पोने उडविले; दोघांचा मृत्‍यू

महाड ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रात प्रिव्ही कंपनीमध्ये सोलम कोंड ढेबेवाडी येथून रात्रपाळीसाठी घरातून पायी निघालेल्या चार कामगारांना रात्री उशिरा अकरानंतर या मार्गावरून जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एच 48 बी एम 26 23 या टेम्पो चालकाने पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्‍यू झाला. तर दोन जण जखमी झाले. महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात या गाडीचा चालक चंदन रामकुमार बिंद (वय 23) राहणार जोनपूर उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त वसाहतीमध्ये असलेल्या प्रिव्ही कंपनीत रात्रपाळीसाठी सोलम कोंड येथील चार कामगार पायी निघाले होते. यावेळी त्यांच्या मागून आलेल्या या आयशर टेम्पोने त्यांना उडविल्याचे सांगण्यात आले.
यामध्ये रवींद्र धोंडोभा ढेबे (वय 19) व सचिन शिवाजी ढेबे (वय 18) यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष ढेबे (वय 27) व निलेश ढेबे (वय 18) हे जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेचे वृत्त समजताच महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना महाशक्ती ॲम्बुलन्स संघटनेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तर जखमी दोघांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधी अधिक तपास महाड एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा : 

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशाच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

नीट परीक्षा निकाल घोळाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त