चिल्ली इंजारा येथे दरोड्यात 38 लाखांचा ऐवज लंपास

चिल्ली इंजारा येथे दरोड्यात 38 लाखांचा ऐवज लंपास

यवतमाळ, Bharat Live News Media वृत्तसेवा : महागाव येथील चिल्ली इंजारा येथे दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्य़े सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील महिलांना मारहाण करुन सोने आणि रोख रक्कम लुटून नेली. रविवारी (दि.9) ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संपुर्ण घटनेची माहिती घेतली.
चिल्ली इंजारा येथे इजारदार पांडे यांचा गावापासून दूर शेतामध्ये वाडा आहे. तेथे संतोष मनोहर पांडे, कृष्णा मनोहर पांडे, सविता सुभाष तिवारी हे वास्तवाला आहेत. शनिवारी रात्री पांडे कुटुंब झोपल्यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास सहा अनोळखी व्यक्तींनी वाड्यामध्ये प्रवेश केला. त्यांच्या हातात लाकडी दांडके व धारदार शस्त्र होते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून वाड्यातील लोकांना दांडक्याने मारहाण केली. तसेच पैसा आणि घरातील सोन्याची मागणी केली. घरातील लोकांनी दरोडेखोरांनी नकार दिल्यानंतर त्यांनी जीवे – मारण्याची धमकी देत मारहाण केली.
दरम्यान घरात असलेले 170 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 30 लाख रुपये रोख रक्कम दिली. दरोडेखोरांनी पांडे कुटुंबीयांचे असलेले मोबाइल हिसकावून घेतले. दरोडेखोरांनी एक मोबाईल वाड्याच्या हद्दीत टाकला होता. त्यावरून जखमी महिलेने पोलिसांना फोन करुन घडलेली माहिती सांगितली. यानंतर महागाव ठाणेदार सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक मिलिंद सरकटे, उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप या सर्वांनी श्वानपथक आणि ठसेतज्ञांसह घटनास्थळी पोहचले. याच्या तपासासाठी पाचं पथकांचे गठन करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील संशयितांची चौकशी केली जात आहे. यास घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा :

मानवत तालुक्यात पावसाचे थैमान; ओढ्याच्या पुरात एक महिला बेपत्ता
NDA Cabinet : केंद्रीय मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर, कोणाला मिळालं कोणतं खातं
पुन्हा हरित क्रांती! वाहन उद्योगात भारताची ग्रीन शिफ्टकडे वेगाने वाटचाल