सोलापूर : गावठी पिस्तुल १० जिवंत काडतुसासह तरूणस अटक; शहर गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील दमाणी नगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे पकडले. या कालवाईत कारसह साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. मनोज बिभीषण सुरेराव (वय 38, लक्ष्मी पेठ, दमाणी नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक शहरातगस्त घालत होते. त्यावेळी दमाणीनगर … The post सोलापूर : गावठी पिस्तुल १० जिवंत काडतुसासह तरूणस अटक; शहर गुन्हे शाखेची कारवाई appeared first on पुढारी.

सोलापूर : गावठी पिस्तुल १० जिवंत काडतुसासह तरूणस अटक; शहर गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील दमाणी नगर भागात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे पकडले. या कालवाईत कारसह साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.
मनोज बिभीषण सुरेराव (वय 38, लक्ष्मी पेठ, दमाणी नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक शहरातगस्त घालत होते. त्यावेळी दमाणीनगर लक्ष्मी पेठ येथे रोडलगत, एक लाल रंगाची स्विप्ट कार (एम.एच.13 ई.एफ.0097) थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने कारमधील चालक मनोज सुरेराव यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याचे पॅन्टमध्ये डाव्या बाजूस कमरेजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल खोचलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात 10 जिवंत काडतूस सापडली. पिस्तुल व काडतुसे ही विनापरवाना त्याने जवळ बाळगल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे व कारस असा सात लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेराव याने ते पिस्टल कशासाठी व कोणाला विक्रीसाठी आणले याचा अधिक तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील, श्रीनाथ महाडीक व पोलीस अंमलदार अंकुश भोसले, विजयकुमार वाळके, अर्चना स्वामी, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड आदींनी केली आहे.
The post सोलापूर : गावठी पिस्तुल १० जिवंत काडतुसासह तरूणस अटक; शहर गुन्हे शाखेची कारवाई appeared first on Bharat Live News Media.

Go to Source