भयंकर : परभणीत प्रेमविवाह केलेल्या तरुणाचा वडील, भावाकडून खून

भयंकर : परभणीत प्रेमविवाह केलेल्या तरुणाचा वडील, भावाकडून खून

ताडकळस, Bharat Live News Media वृत्तसेवा: मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील आणि भावाने मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना पिंपरी देशमुख येथे आज (दि.१०) उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिसांनी मृत तरुणाचे वडील आणि भावाला ताब्यात घेतले आहे. Parbhani Crime
गोविंद महादेव अवकाळे (वय 25, रा, पिंपरी देशमुख) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर वडील महादेव अवकाळे (वय ५०) व भाऊ व्यंकटेश अवकाळे (वय 23) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. Parbhani Crime
प्रेम विवाहामुळे गोविंदच्या घरात वाद
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी देशमुख येथील गोविंद याने गावातीलच एका तरुणीशी दोन महिन्यापूर्वी आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. या प्रेम विवाहामुळे नेहमी गोविंदच्या घरात वाद होत होते. दरम्यान, लग्न झाल्यावर गोविंद हा पत्नीला घेऊन पुण्याला राहण्यासाठी गेला होता. शिरकापूर येथे तो खासगी नोकरी करीत होता.
Parbhani Crime : वडिलांनी गावाकडे बोलावून केला घात
गोविंदाच्या पत्नीने सांगितले की, शनिवारी (दि. 8) दुपारी 2 वाजता गोविंदला फोन करून त्यांच्या वडिलांनी गावाकडे बोलावून घेतले. मी गोविंद यांना गावाकडे जाण्यास विरोध केला. मात्र, गोविंद गावाकडे गेले. त्यानंतर वडील महादेव आणि भाऊ व्यंकटेश यांनी शेतातील आखाड्यावर गोविंदच्या डोक्यावर व मानेवर गंभीर मारहाण केली. जखमी गोविंद यास शेजाऱ्यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेनंतर ताडकळस पोलीस ठाण्याचे एपीआय कपिल शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, आपाराव वऱ्याडे पंचनामा केला. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेन देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे राजू मुत्यपोड यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा 

परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा
परभणी : माजलगाव – नांदेड राज्य महामार्गावर अपघात, वडील-मुलाचा मृत्यू
परभणी: मानवतला ग्रामविकास अधिकारी १० हजारांची लाच घेताना जाळ्यात