रायगड: वरंधा घाटात रस्ता खचला; वाहतूक धोकादायक

वरंध, पुढारी वृत्तसेवा: महाड – भोर मार्गावरील वरंध घाट रस्त्याच्या कठड्याचा काही भाग तुटून खचल्याने रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. २ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून धुके आहे. रस्त्याचा काही भाग खोल दरीच्या बाजूला खचला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याची बिकट परिस्थिती होण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसापूर्वी वळणावर कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली …

रायगड: वरंधा घाटात रस्ता खचला; वाहतूक धोकादायक

वरंध, Bharat Live News Media वृत्तसेवा: महाड – भोर मार्गावरील वरंध घाट रस्त्याच्या कठड्याचा काही भाग तुटून खचल्याने रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. २ दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून धुके आहे. रस्त्याचा काही भाग खोल दरीच्या बाजूला खचला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्त्याची बिकट परिस्थिती होण्याची चिन्हे आहेत.
दोन दिवसापूर्वी वळणावर कंटेनर अडकल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वरंध घाटात धुके पसरल्यामुळे वाहन चालकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन धारकांतून केली जात आहे.
प्रत्येक पावसाळ्यात हा घाट दरड कोसळणे आणि विविध दुर्घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. चालू वर्षी पहिल्याच पावसात झालेल्या या घटनेनंतर या मार्गावरील अवजड वाहतुकीसह प्रवासी वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा 

रायगड: महाडमध्ये ३० जवानांचे एनडीआरएफ पथक दाखल
रायगड : काळ नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्‍याने खळबळ!
रायगड: मुलीला मेडिकलला प्रवेशाच्या बहाण्याने डॉक्टरची लाखोंची फसवणूक