मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा :  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. सहकारी पदाधिकाऱ्यांसह रविवारी रात्री अमेरिकेत झालेला उत्कंठावर्धक भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना बघताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचे  निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उद्योग, क्रीडा व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी शोक संवेदना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते  निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.