सर्वकालीन उच्चांकानंतर सेन्‍सेक्‍स २०० अकांनी घसरला, आज शेअर बाजारात काय घडलं?

सर्वकालीन उच्चांकानंतर सेन्‍सेक्‍स २०० अकांनी घसरला, आज शेअर बाजारात काय घडलं?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधानपदी रविवारी (दि. ९ जून) पुन्‍हा एकदा नरेंद्र मोदी शपथबद्ध झाले. भाजप प्रणित एनडीए सरकार स्‍थापन झाले आहे. देशात राजकीय स्‍थैर्याचे संकेत देणार्‍या या घडामोडीचे देशांतर्गत शेअर बाजारावर सकारात्‍मक पडसाद आज (दि.१०जून) उमटले. बाजारात सुरुवातीच्‍या व्‍यवहारात निफ्टीने 23,411 चा तर सेन्सेक्सने 77,079 अंकांना स्‍पर्श करत सर्वकालीन नवा विक्रम केला. मात्र यानंतर नफावसुलीचे सत्रच सुरु झाल्‍याने देशांतर्गत शेअर बाजार सोमवारी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 203अंकांनी घसरला तर त्याचवेळी निफ्टीही 30 अंकांच्या घसरणीसह बंद झाला .
आज बाजारात काय घडलं?

सेन्‍सेक्‍स, निफ्‍टीने अनुभवला सर्वाकालीन उच्‍चांक
सर्वकालीन उच्‍चांकानंतर बाजारात नफावसुलीला जोर
निफ्टीने 23,411 चा नवा विक्रम केला
सेन्सेक्सने 77,079 चा सर्वकालीन नवा विक्रम केला
निफ्टी 30 अंकांनी घसरून 23,259 वर बंद
सेन्सेक्स 2७० अंकांनी घसरला आणि 76,490 वर बंद

Sensex declines 203.28 points to settle at 76,490.08; Nifty drops 30.95 points to 23,259.20
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2024

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला हाेता. सेन्सेक्सने 76,795 चा नवा विक्रम केला होता. सेन्सेक्स 1618 अंकांनी वाढून 76,693 वर बंद झाला होता. रविवारी पंतप्रधानपदी रविवारी (दि. ९ जून) पुन्‍हा एकदा नरेंद्र मोदी शपथबद्‍ध झाले. याचा सकारात्‍मक परिणाम आज ( दि. १०) सुरुवातीच्‍या व्‍यवहारात दिसले. शेअर बाजार नव्या उच्चांकावर उघडले. निफ्टीने 23,400 ची नवीन पातळी गाठली तर सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा ओलांडला. बँक निफ्टीने प्रथमच 50,150 चा टप्पा पार केला . बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स सुमारे 327 अंकांच्या वाढीसह 77,000 च्या वर व्यवहार करत होता. निफ्टीही 100 अंकांच्या वाढीसह 23,390 च्या आसपास होता. बँक निफ्टी 300 अंकांच्या वाढीसह 50,111 च्या आसपास व्यवहार करत होता. आज दुपारी 3 च्या सुमारास सेन्सेक्स 102.75 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 76,590.61 वर व्यवहार करत होता. निफ्टी 9.40 अंकांनी किंवा 0.04 टक्क्यांनी वाढून 23,280.80 वर दिसला. या कालावधीत सुमारे 2376 समभागांची वाढ झाली. तर 1174 समभागांमध्ये घसरण दिसून आली. 91 शेअर्स होते ज्यात कोणताही बदल झालेला नाही.

सर्वकालीन उच्‍चांकानंतर बाजारात नफावसुलीचे सत्र
तेजी अनुभवल्‍यानंतर बाजारात नफावसुलीचे सत्र सुरु झाले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 30 अंकांनी घसरला आणि 23,259 वर बंद झाला. सेन्सेक्स 2०३ अंकांनी घसरून 76,490 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 22 अंकांनी घसरून 49,780 वर बंद झाला. आयटी शेअर्सच्या वाढीला ब्रेक लागला आहे.  त्याचा सर्वाधिक परिणाम आयटीवर झाला. निफ्टीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एम अँड एम आणि बजाज फायनान्सचे समभाग समाविष्ट होते. आज कृषी आणि सिमेंट क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम इंडस्ट्रीज, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स वधारले.
मे महिन्यात ‘एसआयपी’मध्‍ये 20,904 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक
म्युच्युअल फंडाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एसआयपीमधील गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मे महिन्यात ‘एसआयपी’चा ( सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ) गुंतवणूक  20,904 कोटी रुपये इतकी हाेती. एसआयपी गुंतवणूक मे महिन्यात मासिक आधारावर 20,371 कोटी रुपयांवरून 20,904 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
सिमेंट निर्मिती कंपनीचे शेअर्स वधारले
भाजप प्रणित एनडीए सरकारने विकसित भारताच्या उभारणीचा मानस व्‍यक्‍त केल्‍याने आज सिमेंट कंपन्‍याचे शेअर्स वाढले श्री सिमेंट, रॅमको सिमेंट आणि अल्ट्राटेक या कंपन्यांमध्ये ३ ते ५ टक्के वाढ होताना दिसली. तर दुसरीकडे मान्सूनच्या सुधारणेमुळे, FACT, NFL, RCF आणि दीपक फर्टिलायझरमध्येही 3-8 टक्के घट झाली आहे.